खुशखबर । मुंबईत सिडकोच्या 9249 घरांसाठी आजपासून नोंदणीला सुरुवात

एकूण 95,000 हजार घरांचा प्रकल्प, आज 9249 घरांसाठी नोंदणी

मुंबई । मुंबई आणि नवी मुंबई शहरांचा झपाट्याने होत असलेला विकास आणि देशभरातून या मायानगरीमध्ये येणारे लोंढे यांच्यामुळे शहरावर ताण येतो. अशातच गगनाला भिडणारे घरांचे दर यांच्यामुळे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणारे मुंबई, नवी मुंबईमधील घर खरेदीचे स्वप्न आता पुन्हा त्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी म्हाडा, सिडकोसारखे प्रकल्प अनेकांसाठी आशेचा किरण आहे. आज (11 सप्टेंबर) नवी मुंबईमध्ये सुमारे 9 हजारांहून अधिक घरांसाठी नोंदणीला सुरुवात होणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या नोंदणी कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे.

नवी मुंबईमध्ये सिडको कडून सुमारे 95,000 हजार घरं बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 9249 घरांसाठी नोंदणी आजपासून सुरू होत आहे. पुढे टप्प्याटप्प्याने त्यांच्या नोंदणीमध्ये वाढ होणार आहे. सिडकोकडून ही घरं रेल्वे स्टेशन बाहेरील भूखंड, ट्रॅक टर्मिनल आणि इतर ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. सिडकोची ही योजना अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी मोठी योजना असल्याचे सांगितलं जात आहे. तळोजा मेट्रो डेपोमध्ये आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून नोंदणी प्रक्रियेला शुभारंभ होणार आहे. तळोजा येथील मेट्रो डेपोमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

नवी मुंबईमध्ये नुकत्याच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठीही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईमध्ये काही घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने खारघर, सानपाडा अशा भागांमध्ये घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.AM News Developed by Kalavati Technologies