संकट हद्दपार करण्याचा संकल्प करा, मुख्यमंत्र्यांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

आज हिंदु नववर्षाचा प्रारंभ होत असून घरोघरी आरोग्याची, सुरक्षिततेची गुढी उभारावी.

मुंबई | आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा आहे. याच काळात जगावर कोरोनाचे मोठे संकट आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वातधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान शासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी योग्य निर्णय घेत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. संकट हद्दपार करण्याचा संकल्प करा असे म्हणत त्यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्दव ठाकरे म्हणाले की, 'आज हिंदु नववर्षाचा प्रारंभ होत असून घरोघरी आरोग्याची, सुरक्षिततेची गुढी उभारावी. स्वंयशिस्त व सहकार्यातून संकटावर मात करून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेतले तर दुष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळवलेल्या विजयाचा हा दिवस असल्याचे दिसते. यश आणि विजयाचे प्रतीक असलेली ही गुढी त्यामुळेच ऊंच उभारली जाते. हे संकल्पाच्या सिद्धीचेही प्रतीक आहे असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. यातून प्रेरणा घेऊन आपणही कोरोना रुपी संकटावर मात करू. गर्दी न करता घरगुतीस्वरूपात हा उत्सव साजरा करू. आपण सर्वजण सहकार्य करत आहातच, यापुढेही शासनाच्या उपाययोजनांना कृतीशील साथ द्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.'



AM News Developed by Kalavati Technologies