मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात इमारतीचा भाग कोसळला, आतापर्यंत 17 जणांना वाचवण्यात यश

क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या लोहार चाळ येथे युसूफ नावाची इमारत आहे.

मुंबई | मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दक्षिण मुंबईत असलेल्या युसूफ इमारतीचा काही भाग रात्रीच्या सुमारास कोसळला. या इमारतीत अनेक दुकाने होती. मुंबई पोलीस आयुक्तालयाजवळ ही इमारत आहे. 

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकलेले होते. त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले आहे. इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्या बाजुला करण्याचे काम सुरू आहे. 

क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या लोहार चाळ येथे युसूफ नावाची इमारत आहे. ही इमारत चार मजली आहे. इमारतीचा काही भाग रात्रीच्या सुमारास अचानक कोसळला. क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या युसूफ इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळताच तात्काळ मदतकार्य सुरू झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे.  AM News Developed by Kalavati Technologies