अभिनेता आमिर खानचा स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह; कुटुंब सुरक्षित, मात्र आईची चाचणी बाकी

आमिर खानने तत्परता दाखवल्याबद्दल बीएमसी अधिकाऱ्यांचे आभारही मानले आहेत.

मुंबई । बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपले स्टाफ मेंबर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. आमिरने याबाबत ट्विटरवर एक पत्र शेअर केले आहे. त्यात आमिर म्हणतो की, त्याच्या कुटुंबातील इतरांचीही कोरोना चाचणी झाली होती, परंतु ते सर्व निगेटिव्ह ठरले आहेत.

आमिरने लिहितो की, मला सर्वांना सांगायचय की, माझ्या स्टाफमधील काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यांना त्वरित विलग करण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविल्या. यासाठी मला बीएमसीचे आभार मानायचे आहेत. ते माझ्या स्टाफची चांगली काळजी घेत आहेत. यासह संपूर्ण परिसरात स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जात आहे.

“आमच्या सर्वांचीही कोरोना टेस्ट झाली आणि आम्ही निगेटिव्ह ठरलो आहोत. आता मी माझ्या आईची कोरोना टेस्ट करवून घेईन. ती शेवटची अशी व्यक्ती आहे ज्यांची अद्याप कोरोना चाचणी झालेली नाही. माझ्या आईची कोरोना चाचणी नकारात्मक निघावी, अशी प्रार्थना करा. बीएमसीने ज्या तत्परतेने आमची मदत केली आणि त्या सर्वांची काळजी घेतली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्याचे आभार मानू इच्छितो."

दरम्यान, आमिर खानने कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, ते सर्व वैद्यकीय प्रक्रिया आणि काळजीपूर्वक सर्व चाचण्या करत आहेत. याचबरोबर आमिर खानने सर्वांना सुरक्षित राहण्याचे आवाहनही केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies