भाजपची आज तिसरी मेगाभरती, विरोधीपक्षातील बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत.

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये होणारे इनकमिंग जोरात सुरू आहे. आज बुधवारी मुंबईत भाजपची तिसरी मेगा भरती आहे. यामध्ये मोठे नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील जेष्ठ नेते गणेश नाईक, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह, हर्षवर्धन पाटील, आनंदराव पाटील, सत्यजित देशमुख हे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा विरोधकांना मोठा धक्का असणार आहे. आज तीन वाजता मुंबईत यांचा प्रवेश केला जाणार आहे.

भाजपची ही तिसरी मेगा भरती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार आहेत. पक्षातील दिग्गज नेते जाणे हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मातब्बर नेत्यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याने आघाडीसाठी ही वाईट बाब आहे.AM News Developed by Kalavati Technologies