भाजप-सेना युती तुटली?फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना नसेल

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे फडणवीसांनी राजीनामा सुपूर्द केला असून राजीनामा देताना भाजपाचे महत्वाचे नेतेदेखील उपस्थित होते. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असताना तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावेळी भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड हे नेते उपस्थित होते. 

शिवसेनेचे मुद्दे खोडून काढत त्यांनी जोदेशानंतर आतारदार टोलेबाजी केली. शिवसेनेशी चर्चा न होण्याला 100 टक्के सेनाच जबाबदार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तरी युती तुटली, असं मी म्हणणार नाही, असंही ते म्हणाले. राज्यपालांच्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम बघणार आहेत. कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना नसेल.  'अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद अडीच वर्ष मिळेल, असं ठरलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनीही पद आणि जबाबदारी यांचं समसमान वाटप होईल, असं जाहीर केलं होतं. मग मुख्यमंत्री हे पद नाही का? की मुख्यमंत्रिपद ही जबाबदारी नाही?,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फॉर्म्युला ठरला नव्हता हा देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोडून काढला आहे.

एवढंच नाही तर आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांच्या आसपास असलेल्या लोकांनी दरी वाढवण्याचं काम केलं असाही आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच मंत्रिमंडळही बरखास्त झालं आहे. आता राज्यपाल नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू सरकार चालवा, अशी विनंती करू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची दाट शक्यता आहे. विधीमंडळाचे सचिव अनंत कळसे म्हणाले की, नवं सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना अधिकार दिले जातील, मात्र त्यांना कोणतेही धोरणात्मक अधिकार मिळणार नाहीत.  महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात आला असून आज रात्री 12 वाजता विधानसभेची मुदत संपत आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत आहेत. याद्वारे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या नाट्यावर पडदा पडण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहेत. 



AM News Developed by Kalavati Technologies