बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच घुमणार महिला बिग बॉसचा आवाज

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांना महिला बिग बॉसचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

मुंबई | बिग बॉस सीजन 13 अनेक गोष्टींसाठी विशेष असणार आहे. प्रेक्षकांना या शोमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहे. शोची थीम आणि कॉन्सेप्ट मनोरंजक बनवण्यासाठी मेकर्स कठोर मेहनत घेत आहेत. यावेळी ओरिजिनल बिग बॉसच्या आवाजासोबत एक फीमेल बिग बॉसचा आवाज शोमध्ये इंट्रोड्यूस करण्यात येणार आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांना महिला बिग बॉसचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओरिजनल बिग बॉसचा आवाज म्हणजेच अतुल कपूर यांच्या आवाजासोबतच एका महिलेचाही आवाज बिग बॉसच्या घरात ऐकायला मिळेल. कंटेस्टेंट्सला बिग बॉस मेल आणि फीमेल दोन्हींच्या आवाजातून सूचना देण्यात येतील. मात्र अजून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

तर दूसरीकडे वृत्त आहे की, सलमान खानसोबत एक-फीमेल होस्ट बिग बॉसमध्ये यावेळी झळकणार आहे. आता ही कोण असेल याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्यावेळीही एक महिला होस्ट असेल असे वृत्त आले होते. यामध्ये कतरिना कैफचे नाव लिस्टमध्ये सर्वात वरहोते. मात्र या सर्व बातम्या अफवा निघाल्या.
सीजन 13 सुरू होण्यापूर्वी अनेक दावे केले जात आहे. बिग बॉस फॅनक्लब अकाउंट्सवर शोसंबंधीत अनेक नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता या वृत्तांमध्ये किती तथ्य आहे हे पाहणे गरजेचे आहे. सीजन 13 हे 29 सप्टेंबरपासून सुरू होणार असे वृत्त आहे. यावेळीही हा शो सलमान खान होस्ट करणार आहे.



AM News Developed by Kalavati Technologies