मोठी बातमी! बॅडमिंटन स्टार सायना नेहवालला कोरोनाची लागण, थायलंडमध्ये मॅच सुरू होण्याआधीच मोठा धक्का

भारतीय बॅडमिंटन सायना नेहवाल यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

नवी दिल्ली । भारतीय बॅडमिंटन सायना नेहवालला कोरोनाची लागण झाली आहे. सायना सध्या थायलंडमध्ये बॅडमिंटन स्पर्धा खेळ्यासाठी आली असून, तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सायनाला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतासाठी हा एक मोठा धक्का मानल्या जात आहे. कारण येत्या 12 ते 17 जानेवारी दरम्यान योनेक्स थायलंड ओपन खेळले जाणार आहे. यानंतर 19 ते 24 जानेवारीदरम्यान टोयोटा थायलंड ओपन आणि 27 ते 31 जानेवारीदरम्यान बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स होणार आहेत.

कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर तब्बल 10 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय कॅलेंडर जारी झाल्यानंतर सायना नेहवाल मंगळवारपासून सुरु होणाऱ्या थायलंड ओपन सुपर टूर्नामेंट स्पर्धेत सहभागी होणार होती. मात्र सायनाला कोरोनाची लागण झाल्यानी स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.AM News Developed by Kalavati Technologies