बेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर

बेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर

मुंबई । बेस्ट कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहे. येत्या 6 ऑगस्टला मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे. जुलै महिना हा मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक ठरला. या महिन्याच्या सुरुवातीला बेस्टचे किमान भाडे 5 रुपये नव्या सरकारने मुंबईकरांना खूश केले. सरकारच्या निर्णयाने मुंबईकरांनी सरकारला डोक्यावर घेतले खरे मात्र बेस्ट कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने बेस्ट कर्मचारी मात्र हताश झाले. त्यामुळेच येत्या 6 ऑगस्ट पासून बेस्ट कर्मचा-यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचे पत्रक देखील त्यांनी प्रशासनला दिले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

-बेस्ट उपक्रमचा क अर्थसंकल्प मनपाच्या अ अर्थसंकल्पात विलिन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी.

-सन 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची रुपये 7930 ने सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत वेतन निश्चित करावी.

-सन 2016-17 व 2017-18 करिता म.न.पा. कर्मचाऱ्याइतका बोनस द्यावा.

-एप्रिल 2016 पासून लागू करायवयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात.

-कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न तातडीने सोडवावा

-अनुकंपा भरती तातडीने सुरू करा.AM News Developed by Kalavati Technologies