बदलापुरातील 80 वर्षांपूर्वीचा रस्ता एका रात्रीत गायब, पालिकेकडून जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल

आमचा 80 वर्षापूर्वीचा रस्ता चोरीस गेला असून आम्हाला शोधून द्या" अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

बदलापूर | "गावातील पालिकेचा एका रस्ता अचानक गायब झाल्याने, आमचा 80 वर्षापूर्वीचा रस्ता चोरीस गेला असून आम्हाला शोधून द्या" अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. बदलापूर गावातील वार्ड क्रमांक तीन मधील पाण्याच्या टाकीच्या बाजूने जाणारा हा रस्ता या भागातील शेतकरी आणि 40 ते 50 कुटुंबासाठी प्रमुख दळण वळणाचा मार्ग होता. मात्र या रस्त्याचा 200 मीटरभाग एका खाजगी जागा मालकाने जेसीबीच्या साहाय्याने अक्षरश: उखडून फेकून दिला. त्यामुळे रस्त्याच दिसेनासा झाला आहे. एवढेच नाही तर एका ठिकाणी चर खंडून आहे तो मार्ग सुद्धा बंद केला आहे.

आधीच शहरात कोविड सारख्या गंभीर आजाराचा प्रदूषभाव असतांना रिक्षा, रुग्णवाहिका तर सोडाच साधी दुचाकी सुद्धा येथे येऊ शकत नाहीये. त्यामुळे 80 वर्षा पासूनच हा जुना रस्ता पालिकेने लवकरात लवकर बनवून द्यावा. अन्यथा उपोषण करू असा इशारा या नागरिकांनी दिला आहे. दुसरीकडे हा रस्ता माझ्या जागेतून जात असल्याने मी तो बंद केला आहे. मात्र पालिकने आमच्या कडून कायदेशीर परवानगी मागितली तर आम्ही रस्ता तयार करायला आमची कोणतीही हरकत नाही अशी भूमिका जागेचे मालक नंदकुमार भोपी यांनी घेतली आहे.

सदरील प्रकरणात कुळगाव बदलापूर पालिकेने जागेच्या मालक नंदकुमार भोपी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेश दिले असल्याचे पालिकेचे मुख्यधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले आहे.AM News Developed by Kalavati Technologies