अशोक चव्हाणांना आरक्षणाविषयी काही घेणं नाही, ते निजामशाही सारखे वागतात - आमदार विनायक मेटे

मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे विरोधक महाविकास आघाडी सरकारवर टिका करत आहे

लातूर । मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने चाकूर तालुक्यातील बोरगाव बु. येथील तरूणाने गुरूवारी 10 सप्टेंबर रोजी चाकूर येथील तहसीलच्या प्रांगणात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचे सांत्वन करण्यासाठी आ.विनायक मेटे त्याच्या बोरगाव या निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी किशोर कदम यांच्या तब्येतीची चौकशी केली व त्यांना धीर दिला व आघाडी सरकारने मराठा आरक्षणासाठी नवीन वकील लावले म्हणूनच, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली जर शेतीमधील काम माहित नसणाऱ्या व्यक्तीला जर काम करायला लावले, तर तो कसे काम करेल! तसेच नवीन वकिलांना हा प्रकरण कसं माहित होईल. तसेच अशोकराव चव्हाणांना आरक्षणाविषयी काहीही पडले नाही. ते निजामशाही सारखे वागत आहेत. असा टोलाही विनायक मेटे यांनी बोलताना लगावला.AM News Developed by Kalavati Technologies