धक्कादायक ! रुग्णवाहिका नाही तुम्ही चालत या; महापालिका रुग्णालयाचा कोरोना रुग्णाला बेजबाबदार सल्ला

रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं कोरोना रुग्णानं चक्क तीन किलोमीटर पायपीट करत रुग्णालय गाठलं

कल्याण | डोंबिवली पश्चिमेकडील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने चक्क चालत येण्याचा बेजबाबदार सल्ला दिल्याचे उघड झाले आहे. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने या रुग्णांने चक्क तीन किलोमीटर पायपीट करत शास्त्रीनगर रुग्णालय गाठले. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून महापालिकेचा बेजबाबदारपणा उडकीस आला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्ण संख्येने सहाशेच्या टप्पा ओलांडला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शर्थीच्या उपाययोजना करत असल्याचा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाचा हा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कोरोणाचे संक्रमण वाढत असताना कोरोना रुग्णाला रुग्णालय प्रशासनाने चालत येण्याचा सल्ला दिला तसेच रुग्णालयात पोहचल्यानंतर सेक्युरिटी गार्डने देखील या रुग्णासोबत हुज्जत घातली. तसेच डॉक्टरांनी या रुग्णाला 3 तास बसवून ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात देखील पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू असलेला सावळा भोगंळ कारभारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies