भिमा कोरगाव प्रकरणातील अटकसत्राची चौकशी व्हावी - जितेंद्र आव्हाड

अटक झालेले निर्दोष असतील तर मुक्त करावे अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली

ठाणे । भिमा कोरेगाव प्रकरणी तात्कालीन सरकारने केलेले अटकसत्र हे संशयास्पद असून या संपुर्ण अटक सत्रांची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आधीच्या सरकाराने भिमा कोरेगाव प्रकरणी अटक करुन आंबेडकरी चळवळ बदनाम करण्याचे काम केले. भिमा कोरेगाव प्रकरणी ज्या वरिष्ठ जातीच्या लोकांना अटक झालीये त्यांना नक्षलवादी म्हणुन घोषित केलं गेलं आणि मागच्या वेळेच्या सरकारच्या मनात दलितांबद्दल, आंबेडकरी चळवळी बद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना बद्दल किती राग हे सर्वश्रुत आहे अशी जहरी टिका देखील यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा सरकारवर केली. भिमा कोरेगाव प्रकरणातील अटकी या संपुर्णपणे संशयास्पद आहेत. या संपुर्ण अटकांची चौकशी करावी आणि जर अटक झालेले निर्दोष असतील तर मुक्त करावे अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.AM News Developed by Kalavati Technologies