युती तुटलेली नाही, 'फोडाफोडीचं राजकारण करणार नाही' - मुख्यमंत्री फडणवीस

मी उद्धव ठाकरेंना फोन केले, पण माझे फोन त्यांनी घेतले नाही - फडणवीस

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्याचवेळी राज्यपालांनी त्यांना काळजीवाहून मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळण्याचे आवाहन केले आहे. त्याला आवाहनाला फडणवीस यांनी होकार दिल्याने ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत. त्याचवेळी महायुतीमधील प्रमुख मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत झालेल्या मतभेदांवरही फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. मतभेद टोकाला गेल्यानंतरही शिवसेना-भाजप युती तुटलेली नाही. शिवसेनेसोबत चर्चेच दरवाजे खुले आहेत, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

'फोडाफोडीचं राजकारण करणार नाही'

आज, सकाळपासून भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप होत आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, 'आम्ही कोणत्याही प्रकारचे फोडाफोडीचे राजकारण करत नाही. ती आमची संस्कृती नाही. सरकार स्थापन करतानाही आम्ही अशा प्रकारे कोणतिही जुळवाजुळव करणार नाही. जर, कोणाला आमिष दिल्याचा, पैसे दिल्याचा आरोप आमच्यावर कोणी करत असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत.'AM News Developed by Kalavati Technologies