दिल्ली | अग्रगण्य उद्योजकांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या एलन मस्क यांना भारतात व्यवसाय करायचा आहे. स्टारलिंग प्रोजेक्टच्या अंतर्गत एलन मस्क यांनी भारत सरकारकडे व्यवसायाकरिता परवानगी मागितली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ने देशात ब्रॉडबँड कनेक्टिविटीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एक कंसल्टेशन पेपर जाहीर केला होता. यानंतर मस्क यांच्या स्पेस एक्सने भारतात व्यवसाय करण्यासाठी परवानगी मागितली होती. स्पेस एक्स भारतातील दुरसंचार क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहे. असे झाल्यास सर्वाधिक फटका उद्योगपती मुकेश अंबानींच्या जिओ रिलायंसला बसणार आहे. स्टारलिंकचे हाय स्पीड सॅटेलाइट नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील सगळ्या लोकांना ब्रॉडबँक कनेक्टिविटीशी जोडण्यासाठी मदत करेल.
मुकेश अंबानींना टक्कर देणार एलन मस्क, दुरसंचार क्षेत्रात उतरणार स्पेस-एक्स
अग्रगण्य उद्योजकांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या एलन मस्क यांना भारतात व्यवसाय करायचा आहे.
.jpg)