निवडणूक जिंकल्यावर सर्वप्रथम बाळासाहेबांचे कला दालन तयार करणार - हरेश सुतार

हरेश सुतार म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे आमच्या आराध्यदैवत आहे

मिरा भाईंदर । विधान सभेत मनसेचा जनाधार नसताना मनसेने हरेश सुतार यांना उमेदवारी दिली आहे. सुतार यांनी बाळासाहेब ठाकरे कला दालनच्या आरक्षित जागेवर नारळ फोडून आपल्या प्रचाराला शुभारंभ केला. काही दिवसांपूर्वी या कला दालनसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये राडा झाला होता. हरेश सुतार म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे आमच्या आराध्यदैवत आहे. केंद्रात राज्यात आणि मिरा भाईंदर शहरात युतीची सत्ता असताना स्व. बाळासाहेबांच्या कला दालन साठी पैसे भेटले नाही ही आमच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. मनसे उमेदवार हरेश सुतार यांनी बाळासाहेब ठाकरे कला दालन च्या जागेवर नारळ फोडून आपल्या प्रचाराला शुभारंभ केला. आम्ही निवडणूक जिंकणार आणि सर्व प्रथम बाळासाहेबांचे कला दालन तयार करणार असंही ते म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies