महाराष्ट्रात एकूण 4 माजी पोलीस अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात

माजी पोलीस अधिकाऱ्यांना जनता संधी देणार का?

मुंबई । महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 288 विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार आपले नशीब आजमवण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. शेतकरी, व्यवसायिक आणि विविध क्षेत्रातल्या लोकांनी राजकारणात प्रवेश करून निवडणूक लढवताना आपण अनेकदा पाहिलं आहे. पोलीस दलात काम करणारे अधिकारीसुद्धा यापासून सुटले नाहीत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण 4 माजी पोलीस अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून वेगवेगळ्या पक्षातर्फे ते निवडणूक लढवत आपलं नशिब आजमावत आहेत.

विधानसभा निवडणूक अवघ्या 10 ते 12 दिवसांवर ठेवून ठेपल आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी राजीनामा देऊन याआधी खासदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते निवडूनसुद्धा आले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आता अनेक माजी पोलीस अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबई आणि उपनगरात मिळून एकूण तीन माजी पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळवली. यामध्ये माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, निवृत्त एसीपी समशेर पठाण, निवृत्त पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड यांचा समावेश आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातून राजेश पाडवी हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

इंकौंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघाकडून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. त्याचबरोबर मुंबई पोलीस दलात एसीपी म्हणून कर्तव्य बजावलेले समशेर पठाण हे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून माजी पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय त्यामुळे मुंबईत एकूण तीन माजी पोलीस अधिकाऱ्यांनी राजकारणात प्रवेश करून थेट विधानसभा गाठण्याचे लक्ष ठेवलं आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाडा विधानसभा मतदारसंघातुन भाजपकडून निवृत्त पोलीस अधिकारी राजेश पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. पाडवी यांचे वडील उद्देसिंग पाडवी हे या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार होते त्यांच्याच जागी आता राजेश पाडवी लढत आहेत. निवृत्तीला 8 वर्षे शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. मात्र पोलीस दलानंतर राजकारणात एन्ट्री करू पाहणाऱ्या या माजी पोलीस अधिकाऱ्यांना जनता संधी देणार का हे पाहणे महत्वाचे आहे.AM News Developed by Kalavati Technologies