'57 टक्के लोकांना कोरोना झाला, ठाकरेंना कळलंही नाही', किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला

लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याचं श्रेयही ठाकरे परिवार घेतं आहे, किरीट सोमय्यांचा शाब्दिक हल्ला

मुंबई | मुंबईत 57 टक्के लोकांना कोरोना होऊनही गेला, आणि ठाकरे सरकारला ते कळलंच नाही, आता या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याचं श्रेयही ठाकरे परिवार घेतेय, अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे परिवारावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी ही टीका केली.

नुकत्याच झालेल्या चाचण्यांमध्ये मुंबईत 57 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडीज तयार झाल्याचं, म्हणजेच या लोकांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं होतं. यावरून टीका करताना आपल्याला मुंबईचे पालकमंत्री आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त यांची लाज वाटत असल्याचं सोमैय्या म्हणाले. तसंच या लोकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीजचं श्रेयही आता ठाकरे परिवार घेत असल्याची टीका सोमय्यांनी केली. यावरून लगेचच शिवसेनेनेही सोमय्यांना लक्ष्य केलं.

सोमय्या यांनी नुकतीच ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलची पाहणी केली. त्यांनी खरंतर तिथे चार दिवस राहून यायची गरज होती, असं म्हणत शिवसेनेचे केडीएमसीचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी सोमय्या यांना प्रत्युत्तर दिलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies