कल्‍याण डोंबिवलीत आज 48 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, दोन जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात महापालिका क्षेत्रात 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

कल्याण | कल्‍याण डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासात महापालिका क्षेत्रात 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 बळी या आजारानं घेतला आहे. मृतांमध्ये अंबिवली येथे राहणारा 75 वर्षीय आणि डोंबिवली पश्चिममधील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान आज आढळून आलेल्या या रुग्णांमुळं महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्‍णांची संख्‍या 642 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 17 जणांचा या आजारानं बळी घेतला असून 242 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. अजूनही 383 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies