Corona Updates; महाराष्ट्रात 2 हजार 940 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दिवसभरात 63 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासात राज्यात 2 हजार 940 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे.

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे थैमान सुरूच आहे. गेल्या 24 तासात राज्यात 2 हजार 940 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर याच कालावधीत 63 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 44 हजार 582 इतकी झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. आत्तापर्यंत कोरोनाची बाधा होऊन महाराष्ट्रात 1517 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 857 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यभरात आजवर 12 हजार 583 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या थोडाफार दिलासा देणारी आहे. नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं गरजेचं असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हंटल आहे.AM News Developed by Kalavati Technologies