मुलांचे संगोपन कोण करणार या विवंचनेतून वडिलांकडून पोटच्या दोन मुलांचा गळा दाबून खून

मुलांचे सांगोपन कोण करणार या कारणातून पित्याने हे लाजिरवाणे कृत्य आहे.

सातारा | शिवराळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका वडिलांकडून आपल्या पोटच्या दोन मुलांची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. शिवरळ येथे पहाटे ही घटना उघडकीस आली. महामार्गावर वाहनांची तापासणी करताना खूनाचा उलघडा झाला. आरोपी चंद्रकांत मोहिते असे आरोपी वडिलांचे नाव आहे. ते घाटकोपर येथे राहणारा आहे.

या धक्कादायक घटनेचे कारणही आरोपीने सांगितले आहे. मुलांचे सांगोपन कोण करणार या कारणातून पित्याने हे लाजिरवाणे कृत्य आहे. आरोपी वडील हे आजाराने त्रस्त होते. आरोपीने स्वतः पोलिसांना ही माहिती दिली आहे. मी आजारी असताना मुलांचे संगोपन कोण करणार याच विचारातून त्यांनी अवघ्या 7 वर्षांच्या प्रतिकची आणि 11 वर्षांच्या गौरवीचे आयुष्य संपवले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies