कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर; दिवसभरात 329 रुग्णांची वाढ, 11 जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

ठाणे | कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज गेल्या 24 तासात 329 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानं कोरोनाबाधितांची एकूण संख्या 19 हजार 638 इतकी झाली आहे. तर याच कालावधीत 11 जणांचा मृत्यू झाल्यानं मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 347 वर गेलाय.

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 308 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 504 वर पोहचली आहे. दरम्यान आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्व - 87 रुग्ण, कल्याण पश्चिम - 68 रुग्ण, डोंबिवली पूर्व - 79 रुग्ण, डोंबिवली पश्चिम -51 रुग्ण, मांडा टिटवाळा -24 रुग्ण, मोहने - 20 रुग्णांचा समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies