...पण 2000 साली काय झाले होते?, उद्धव ठाकरेंचा पवारांना सवाल

आता तुम्ही सांगताय सूडाचे राजकारण होतेय म्हणून?

मुंबई । दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की‘ईडी’सह सर्व यंत्रणा विरोधकांवर सूडाचे राजकारण करण्यासाठी वापरल्या जात आहेत असे शरद पवार म्हणाले. ते सूडाचे राजकारण असेल किंवा नसेल, पण हा महाराष्ट्र सूडाचे राजकारण कधी सहन करणार नाही. आज ईडी आली तेव्हा तुम्हाला सूडाचे राजकारण आठवले. पण 2000 साली काय झाले होते? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ‘सामना’तील अग्रलेख शोधून गुन्हा दाखल केला. निदान तेव्हा तरी तुम्ही ‘सामना’ वाचला. अरे, ‘सामना’ नेहमी वाचाल तर तुम्हीही वाचाल असा टोला लगावतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांना अटकेची भाषा करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावर कोण होते? आता तुम्ही सांगताय सूडाचे राजकारण होतेय म्हणून? तेव्हा तुम्ही काय केलेत, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. हिंदूंना वाचवले म्हणून गुन्हेगार ठरवणारी तुम्ही आणि तुम्ही सांगता सूडाने वागताहेत. हा अनुभव बघितल्यानंतर आम्ही युती भाजपसोबत करायची नाही तर कुणासोबत करायची, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. दरम्यान, राज्यात पुन्हा शिवसेनेला सत्ता हवीच आहे, असे ठासून सांगत कुचराई करू नका, प्रामाणिकपणे काम करून विधानसभेवर भगवा फडकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.AM News Developed by Kalavati Technologies