न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने, मराठा समाज पुन्हा रस्त्यावर

नांदेड-हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या वजीरगाव फाट्यावर, मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आला आहे

नांदेड । उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज पुन्हा आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. नांदेड-हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या वजीरगाव फाट्यावर मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. समाजाला आंदोलनात जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत कोणतीही शासकीय पदभरती तसेच एमपीएससी परीक्षा होऊ देणार नाही. असा इशारा देण्यात आला असून, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. यासह यंदाचा पीकविमा सरसकट मंजूर करण्यात यावा. तसेच उत्तर प्रदेशमधल्या हाथरस बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी. अशा विविध मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या आहेत.

परंतु या मागण्याचं निवेदन स्विकारण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळ सुद्धा मिळाला नसल्याने, आंदोलनकर्त्यानी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या मागण्यांवर त्वरीत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गाड्यांच्या लांबच-लांब रांगा दिसून येत होत्या. सुमारे दीड ते दोन तास वाहतूकही खोळंबली होती. आंदोलनानंतर कूंटूर व उस्माननगर पोलिसांकडून काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.AM News Developed by Kalavati Technologies