मुंबई । मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी वर्ष असले तरी, राजकीय एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना पाहायला मिळत आहे. मनसेने मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची तुलना विरप्पन गँगसोबत केली आहे. 'विरप्पने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगर पालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल.' असे ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मुंबईसह राज्यातील महानगर पालिकेच्या पार्श्वभुमीवर आज मनसेची महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहे.

विरप्पन नि जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 29, 2021