महिला बचत गटांना आँनलाईन प्रक्रीयेत वंचित ठेवल्यास निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

लेखी न कळवीता ठेकेदारांच्या हितासाठी घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी शासनाकडे मागणी

नांदेड । महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. परंतू, त्या योजनेत ठेकेदारांनी महिला बचत गट स्थापन करून शासनाच्या योजना लाभ मिळावा यासाठी शासनाशी हातमिळवणी केली जात आहे.ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आँनलाईन प्रक्रीयेची माहिती वेळेवर लेखी न देता तोंडी देत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचत गटांनी मोठ्या प्रमाणात केलेला खर्च करूनही वंचित राहावे लागत आहे. शासनाने निर्णय मागे घ्यावा अन्यथा येणा-या विधानसभा निवडणुकीवर नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या वतीने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असुन अशा आशयाचे निवेदन हादगाव तहसीलदार श्रीमती डॉक्टर मृणाल जाधव यांना दिले आहे. या निवेदनावर देवकाबाई मुलगीर, लता दहिभाते, जिजाबाई बावणे, शारदा डोईफोडे, स्वाती चिंचोले, दर्शना नरवाडे, रेखाबाई शिंदे यांच्या सह हदगाव तालुक्यात महिला बचत गटांच्या अध्यक्ष सचिव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.AM News Developed by Kalavati Technologies