गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी कामगार संघटना स्थापना करणार - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

भोकरदन मध्ये विविध शासकीय योजनांचा मेळावा संपन्न

जालना। भोकरदनमध्ये विविध शासकीय योजनेचा मेळावा घेण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, निर्मला रावसाहेब दानवे आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे यांच्या हस्ते भोकरदन तालुक्यातील लाभार्थ्यांना राशन कार्ड वितरण, धनादेश यांसह विविध शासकीय योजनेतील लाभधारकाना वाटप करण्यात आले.

यावेळी केंदीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी एक कामगार संघटना स्थापना करणार आहे. तिचे नाव गरीब, श्रमिक, कामगार मंडळ असे आहे. तसेच हे सरकार गरिबांचे सरकार आहे असेही शेवटी बोलताना म्हणाले. तसेच आ. संतोष दानवे यांनी ही विविध शासकीय योजनेची माहिती सांगितली. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड यांच्या अधिकारी व तालुक्यातील शासकीय योजनेतील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies