मराठवाड्यात एकही आमदार, खासदार नाही त्यांच्या मागे जाताच कशाला?, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांसह जनतेला आवाहन

समोरचा माणूस निवडणुकीत पडला तरी आमदारच राहणार आहे, मग माझं कशाला नुकसान करता - पंकजा मुंडे

परळी । ज्या पक्षाला भविष्य नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीचा जिल्हयात अथवा मराठवाडय़ात एकही आमदार, खासदार नाही त्यांच्या मागे जाताच कशाला?’ असा प्रश्न करून महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, विनाकारण मतं व्यर्थ घालू नका, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला आवाहन केलं आहे. राष्ट्रवादीतील लोक मला मतदान करणार आहेत. समोरचा माणूस निवडणुकीत पडला तरी आमदारच राहणार आहे. मग माझं कशाला नुकसान करता. परळीत दोघांना आमदार राहू द्या की असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये असलेले ज्येष्ठ नेते ऍड. प्रताप ढाकणे यांना भाजपकडून उमदेवारी द्यावी, या मागणीसाठी पंकजा मुंडे यांच्याकडे गेलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्धच बंड अखेर शमले. उलट पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांची फिरकी घेत राजळे यांची उमेदवारी सुरक्षित असल्याचे संकेत दिले.

परळी तालुक्यातील हाळम विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, गेल्या 5 वर्षात मंत्री म्हणून काम करत असताना भरभरून विकासनिधी देण्याबरोबरच विवाह सोहळा, महा आरोग्य शिबीर, बचतगटांच्या माध्यमातून मी तुमची सेवा केली. भविष्यातही मीच मंत्री म्हणून तुमची सेवा करणार आहे. 'ज्या पक्षाला भविष्य नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीचा जिल्हयात अथवा मराठवाड्यात एकही आमदार, खासदार नाही त्यांच्या मागे जाताच कशाला?' असा प्रश्न करून महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, विनाकारण मतं व्यर्थ घालू नका, असे राज्याच्या ग्रामविकास आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला आवाहन केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies