पाथरीत भीक-याने दाखवली मनाची श्रीमंती, पुरग्रस्तांना केली दोन हजारांची मदत

अवलियाची दानत पाहून मदत मागणारे ही आवाक झाले

परभणी | ज्या माणसांमुळे माझा आणि माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. आज तीच माणसं संकटात असतांना मी त्यांना मदत करणे माझे कर्तव्य समजतो असे म्हणत, दोन्ही पायांनी अपंग असलेले विठ्ठल नगरातील शेख रोशन शेख यांनी पुरग्रस्तांना 2हजार रूपयांची मदत केली आहे. उमर हे सायकल रिक्शातुन पाथरी शहरात एक-दोन रुपये भिक मागून आपला उदरनिर्वाह चालवतात. या अवलियाची दानत पाहून मदत मागणारे ही आवाक झाले.

सांगली, कोल्हापूर, क-हाड भागात कृष्णा, वारणा आणि पंचगंगेमुळे या दोन्ही जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे हाहाकार उडाला असून लाखो लोक बेघर झाल्याने या लोकांना मदत देण्यासाठी मंगळवार दि. १३ रोजी पाथरी शहरातून मदत फेरी काढण्यात आली. श्रीराम मंदिरापासून सुरू झालेल्या मदत फेरीत शहरातील नामवंत मंडळी सहभागी झाली होती. या वेळी धान्यासह रोख रक्कम पुरग्रस्तांना मदत म्हणून देण्यासाठी अनेक हात पुढे येता होते. एका ठिकाणी कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी गवताचे गाठोडे घेऊन बसलेली म्हातारी आई पुढे सरसावली. काही रुपयांची मदत तीने या मदत पेटीत टाकली. शहरातील लहान-लहान व्यवसाईक मदतीसाठी पुढे येताना दिसले. तर माता भगीनी धान्याच्या स्वरुपात मदत देत होत्या. पाथरी तालुक्याच्या ग्रामीण भागात ही दुष्काळ असतांना नागरीक पुढे येत असून गावांगावात धान्य आणि रोख रकमा जमा करत आहेत. ही सर्व मदत धान्याच्या रुपात थेट पुरग्रस्त भागात स्वयंसेवकांसह पोहचवणार असल्याचे मदत फेरीतील पाथरीकरांनी सांगितले.



AM News Developed by Kalavati Technologies