बिडकीन येथे ढोल ताशाच्या गजरात सवारी मिरवणुक

सवारी मिरणुकीत ढोल ताशाच्या गजराने बिडकीन परिसर दुमदुमुन गेला होता.

पैठण।  तालुक्यातील बिडकीन येथे सालाबादप्रमाणे मुस्लिम समाजातील पवित्र सण मोहरम निमित्त सवारीयाची स्थापना करण्यात आली होती.

मंगळवारी या सवारीची मिरवणुक टकार मोहल्ला, सादात चौक, बागवान गल्ली, मारवाडी गल्ली, गौसीया मजीत या मार्गावरुन काढण्यात आली. सवारी मिरणुकीत ढोल ताशाच्या गजराने बिडकीन परिसर दुमदुमुन गेला होता. या मिरवणुकीत गावातील सर्व समाज बांधव राजकीय, समाजिक क्षेत्रातील व पंचक्रोशितील नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सवारीची निलजगाव रोडच्या बाजुच्या विहिरीत विसर्जन करुन मिरवणुकीचा समारोप करण्यात आली.AM News Developed by Kalavati Technologies