धक्कादायक! शेतीच्या किरकोळ वादातून चुलत्यानेच केली पुतण्याची हत्या

शेतीच्या वादातून भोकरदन तालुक्यात चुलत्यानेच पुतण्याचा खून केल्याची घटना घडली आहे

भोकरदन । भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्यानेच पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौतिकराव आनंदा गावंडे (वय 37) असे मृत तरुणाचे तर, सुखदेव सारजूबा गावंडे असे आरोपीचे नाव आहे. शेतीच्या किरोकोळ वादातून चुलत्या-पुतण्य़ात हाणामारी झाली. या हाणामारी आरोपी सुखदेव गावंडे यांनी पुतण्या कौतिकराव गावंडे याच्या डोक्यावर फावडयाचे वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता, कौतिकरावची प्रकृती खालावल्याने त्यांना मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, पोलीसांनी आरोपी सुखदेव सारजूबा गावंडे, सुधाकर गावंडे आणि परमेश्वर गावंडे यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.AM News Developed by Kalavati Technologies