धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादीचा हा उमेदवार लढवणार निवडणूक

संजय दौंड हे राष्ट्रवादीकडून या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बीड | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला. दरम्यान ही निवडणूक लढवताना त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी निवडणूक होत आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. संजय दौंड हे राष्ट्रवादीकडून या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. संजय दौंड अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलंय संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत. पण शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता विधान परिषदेसाठी दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies