भोकरदन शहरात संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

टाळ मृदंगच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणूकिमध्ये महिलांनी व लहान मुलांनी वेधले सर्वांचे लक्ष


जालना | भोकरदनमध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शहरातून रथाची मिरवणूक काढण्यात आली. मधुरसुरांच्या भक्ती गीतांनी व टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणूकिमध्ये महिलांनी फुगडी, लहान मुलांनी काठी फिरवून भोकरदन शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाआधी कोल्हापूर व सांगली मध्ये पुरामध्ये मृत्यू झालेल्या नागरीकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर आ. संतोष दानवे, नगरध्यक्षा मंजुषा देशमुख, ऑल इंडिया सोनार फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर, ह.भ.प. संतोष आढावणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भोकरदन तालुका कारागीर संघटनेचे पदाधिकारी तसेच सोनार समाज बांधव व सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies