अमर-अकबर-अँथनिचा संसार चांगला चालवा, महाविकास आघाडीवरून रावसाहेब दानवेंची टोलेबाजी

राजकारणात जसा बॉल आला तसा टोलवावा लागतो, राजकारणात एकदा संधी सुटली तर विषय संपला- दानवे

जालना । अमर अकबर अँथनिचा संसार चांगला चालवा असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी वरून चांगलीच टोलेबाजी केली. राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रावसाहेब दानवेंनी चांगली फटकेबाजी केली

तुमचा अमर अकबर अँथनीचा संसार चांगला चालवा. नाही तर अर्ध्यावरच मोडला डाव, अशी आम्हाला पुन्हा संधी देवू नका, तुमचा सारा खेळ खेळून घ्या. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करायला बसलो नाहीत फक्त तुमच्या डिस्टर्ब होवू देवू नका असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीलाही चिमटे काढले. त्याचबरोबर पिक्चर, राजकारण आणि क्रिकेट मध्ये कुणालाही यावं वाटतं. मात्र पिक्चरममध्ये रिटेक करता येतो क्रिकेटमध्ये सराव करता येतो मात्र राजकारणात जसा बॉल आला तसा टोलावा लागतो म्हणत दानवेंनी चांगलीच बॅटिंग केली.AM News Developed by Kalavati Technologies