गावच्या गावं उद्धवस्त झाले मग पंचनामे करण्याची गरज काय? - राजू शेट्टी

उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला या पावसाचा सर्वाधत जास्त फटका बसला आहे.

जालना | राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. मात्र शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना मुंबईत सत्ता कशी मिळवता येईल याकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच गावच्या गावं उद्धवस्त झालेली असताना सरकारला पंचनाने करायची गरज काय असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, परतीच्या पावसामुळे शेतातील पिके वाहून गेली आहेत. नदीकाठच्या जमिनीही वाहून गेल्या आहेत. त्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी. नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. त्याचप्रमाणे संपूर्ण गाव अतिवृष्टीमुळे नुकासग्रस्त झाले असताना सरकारला पंचनामे करण्याची गरज काय आहे असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी नुकासनग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. जालन्यात नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते.

उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला या पावसाचा सर्वाधत जास्त फटका बसला आहे. हाततोंडाशी आलेली पिकं या पावसामुळे वाया गेली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत द्यावी असे निर्देश देवेंद्र फडणवीसांकडून यांनी मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकर्‍यांचे झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीतून घेतला होता.AM News Developed by Kalavati Technologies