औरंगाबाद | संचारबंदीमुळे रुग्णवाहिकेमधून होतेय प्रवाशांची वाहतूक

पोलीस नेमकी काय करावाई करणार याकडे लक्ष लागले आहे

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू केली आहे. अनेक नागरिक कामानिमित्ताने महानगरपालिकेच्या ठिकाणी कामाच्या शोधात गेले. मात्र सिमाबंदी आणि वाहतूक वर निर्बंध केल्याने नागरिक अडकून पडले. घर जवळ करण्याच्या नादात वेगवेगळी शक्कल शोधत आता रुग्णवाहिकेचा वापर केल्याचा प्रकार वाशीम मध्ये उघड झाला आहे. अनसिंग पोलिसांच्या कसून केलेल्या तपासणीतून हा प्रकार उघड झाला आहे. या रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण नाही तर प्रवासी पोलिसांच्या हाती लागले . हे सगळे 10 प्रवासी औरंगाबाद हून यवतमाळला जात होते, आता पोलीस नेमकी काय करावाई करणार याकडे लक्ष लागले आहे.AM News Developed by Kalavati Technologies