पंकजा मुंडेंनी ट्विटरवरुन हटवला भाजपचा उल्लेख, 12 तारखेला घेणार मोठा निर्णय

पंकजा मुंडे राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत

मुंबई | पंकजा मुंडे या लवकरच राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे. याचा संकेत त्यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट करत दिला होता. मात्र त्यांनी अजून एक संकेत दिला आहे. यावरुन त्या लवकरच भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चांणा उधाण आले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरील भाजपचा उल्लेख हटवला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेचा धक्कादायक पराभव झाला. त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघामधून त्यांचा भाऊ धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता त्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

फेसबुक पोस्टमध्ये पंकजा मुंडेंनी लिहिले होते की, राज्यातील सत्ता भाजपने गमावली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. रविवारी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट लिहली आहे. त्या आता आपल्या कारकिर्दीविषयी मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत.

पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. 12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस...त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय ...तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? अशा आशयाची पोस्ट पंकजा मुंडेंनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies