उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वसमत तालुक्यात नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वसमत तालुक्यात नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन

हिंगोली । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत वसमत तालुक्यातील दिनांक 20 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान भगवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून यानिमित्तान तालुक्यातील विविध तेरा गावात शिवसेनेच्या वतीने वसमत तालुक्यात लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज एक गाव प्रमाणे भव्य नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सोहळा रविवार म्हणजे आज 21 जुलै रोजी सकाळी दहा वाजता सत्यनारायण टॉकीज रोडवरील राजस्थान मंदिर येथे करण्यात आला आहे. या उद्घाटनाच्या अध्यक्षपदी माजी लोक शक लोक लेखा समिती अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री आमदार जयप्रकाश मुंदडा हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील काळे वसमतचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.AM News Developed by Kalavati Technologies