नांदेड येथे जीपचा अपघात, 8 विद्यार्थी जखमी

मुखेड बिदर या राष्ट्रीय महामार्गावरील आखरगा फाटयाजवळ जीपचा अपघात झाला.

नांदेड | मुखेड बिदर या राष्ट्रीय महामार्गावरील आखरगा फाटयाजवळ जीपचा अपघात झाला. मुखेड तालुक्यातील आखरगा व राठोडवाडी येथून विद्यार्थांना मुखेड येथिल शाळेला घेऊन जाणाऱ्या खाजगी जिपच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला खड्यात गेली. या अपघातात जिपमधील 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये स्वाती चव्हाण, कृष्णा पवार, प्रियंका राठोड, सुजय राठोड, सुवर्णा राठोड, संजीवनी श्रीरामे, ओम राठोड हे आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर जिपमध्ये 15 ते 20 विद्यार्थीही अपघातातून बचावले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies