नांदेड । भाग्य नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालेगाव रोडवर पोलीस चौकीचे उदघाटन

नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते चौकीचे उद्घाटन.

नांदेड । शहराचा सुरक्षिततेचा विचार करून व गुन्हेगारांवर आळा बसविण्यासाठी नांदेड शहरातील भाग्य नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालेगाव रोडवर पोलिस चौकीचे उद्घाटन करण्यात नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्वी बंद पडलेली ही पोलीस चौकी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या पुढाकाराने पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

नांदेडचा भाग्यनगर परिसर हा उच्चभ्रू लोकांचा परिसर म्हणून परिचित आहे. दररोज हजारो चाकरमान्यांनी हा भाग गजबजलेला असतो. त्यामुळे येथे दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी तसेच मुलींच्या छेडछाडीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने या भागात पोलीस चौकी उभारण्यात आली. या पोलीस चौकीत 2 पोलीस उपनिरीक्षक, 2 पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. 1998 साली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक लक्ष्मीनारायन यांनी शहरात पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला होता, कालांतराने यातील काही पोलीस चौक्या बंद पडल्या. त्यानुसार पुन्हा एकदा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी बंद पडलेले पोलीस चौकी कार्यान्वित केली आहे, नांदेडकरांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies