दिलासादायक! औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, आज जिल्ह्यात 120 कोरोनाबाधितांची भर

जिल्ह्यात सध्या 3 हजार 103 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 999 जणांचा मृत्यू झाला आहे

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. आज जिल्ह्यात 120 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 35 हजार 332 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 3 हजार 103 जणांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 999 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 31 हजार 230 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 29 आणि ग्रामीण भागात 02 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (53)

तोरणागड नगर (1), उस्मानपुरा (1), घाटी परिसर (2), महालक्ष्मी कॉलनी, ठाकरे नगर (1), बेगमपुरा (1), आंर्चागन, मिटमिटा (1), टिळक नगर (1), जालना रोड (1), सुराणा नगर (1), नक्षत्रवाडी (1),विश्वेश्वरया कॉलनी (1), हर्सुल, अशोक नगर (1), नक्षत्रवाडी (1), शरणापूर फाटा (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (2), मेहेर नगर, गारखेडा (1), हडको (1), सप्तपदी मंगल कार्यालय परिसर (1), शुभश्री कॉलनी (1), अविष्कार कॉलनी (1), बीड बायपास परिसर (3), जय भवानी नगर (1), एन सात सिडको (1), चिकलठाणा (1), श्रीकृष्ण नगर (1), माळीवाडी (1), बन्सीलाल नगर (1), महाजन कॉलनी (1), बजाज हॉस्पीटल परिसर (1), गादिया विहार (1), सिडको परिसर (1), हॉटेल ग्रीन ऑलिव्ह परिसर (2), हॉटेल फन रेसिडन्सी परिसर (1), अजंटा ऍ़म्बेसेडर परिसर (1), लेमन ट्री हॉटेल परिसर (1), इंडियाना रेस्टॉरंट परिसर (1), अमरप्रीत हॉटेल परिसर (1), चायनिज कॉर्नर परिसर (1), बग्गा इंटरनॅशनल परिसर (1), इंडियाना एक्जॉटिका (1), सिद्धार्थ नगर, केंब्रिज परिसर (1), पिसादेवी दत्त नगर (1), ब्रिजवाडी (1), कांचनवाडी (1), एन अकरा हडको (1), मयूर पार्क परिसर (1), अन्य (2)

ग्रामीण (38)

कान्हेगाव, वारेगाव (1), लासूर स्टेशन, गंगापूर (1), जय भवानी नगर, सिल्लोड (1), चित्तेगाव, पैठण (1), नवी गल्ली, वैजापूर (1), वरझडी (1), इंद्रप्रस्थ कॉलनी (1), भराडी सिल्लोड (1), वाकला, वैजापूर (1), कचनेर (1), म्हाडा कॉलनी (2), नर्सरी कॉलनी, रांजणगाव (1), गुरू माऊली नगर, वडगाव (1), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (1), दत्त कॉलनी, वाळूज (1), हिदायत नगर, वाळूज (1), बाभूळगाव, मनूर (1), शिऊर वरचा पाडा (1), देवगाव, कन्नड (1),छाजेड नगर, कन्नड (1), भोलेश्वर कॉलनी, कन्नड (1), शेरोडी, कन्नड (1), शेंद्रा (3), रेलगाव, सिल्लोड (1), टिळक नगर, सिल्लोड (1), पालोद, सिल्लोड (1), जीवरग टाकळी, सिल्लोड (1), आमठाणा, सिल्लोड (1), टिळक रोड, वैजापूर (1), समिक नगर, वैजापूर (1), येवला रोड, वैजापूर (1), जाबरगाव, वैजापूर (1), असेगाव (1), वैजापूर (2)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गुलमंडी, सराफा 87 वर्षीय पुरूष, कांचन नगरातील 85 वर्षीय स्त्री, वैजापुरातील राजुरा येथील 80 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात गुलमंडी रोड, दलालवाडी येथील 80 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies