दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात दुधाचे टँकर फिरू देणार नाही - बबनराव लोणीकर

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुध दरवाढीसाठी मंठा येथे आंदोलन करण्यात आले.

जालना | राज्यभरात भाजपकडून दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान भाजप नेत्यांनी सरकार दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे राज्य सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आज जालना जिल्ह्यातील मंठा येथे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी लोणीकरांनी दूधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान आणि दुधाच्या भुकटीसाठी 50 रुपये अनुदान सरकारने जाहीर करावं अशी मागणी केली आहे.

त्याचप्रमाणे गायीच्या दुधाला तीस रुपये दर देण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी, रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे असे असले तरी सरकार मात्र या सर्व बाबतीत गंभीर नाही, त्यामुळे लवकरात लवकर दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात एकही दुधाची टँकर फिरू देणार नाही असा इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महायुतीतर्फे 21 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देखील पाठवण्यात आले होते. सरकारने या मागण्या मान्य न केल्यास 01 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महावितरणने सरकारला देण्यात आला होता. तरीदेखील कोणताही गांभीर्य याबाबत सरकारने घेतलेली नाही सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक पद्धतीने केले जात असून सोशल डिस्टंसिंगचे पालन यामध्ये करण्यात येत आहे. केंद्र सरकारने दूध भुकटी आयात केलेली नसताना चुकीची माहिती पसरून केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून त्याबद्दल राज्यसरकार ने दूध उत्पादकांची माफी मागावी असे देखील यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले

मंठा येथे लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मंठा तालुक्याच्या वतीने आज विडोळी फाटा या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी सरकार विरोधी नारेबाजी करत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, सभापती संदीप गोरे, सभापती नागेशराव घारे, उपसभापती राजेश मोरे, जि. प. सदस्य पंजाबराव बोराडे, संचालक विठ्ठलराव काळे, निवास देशमुख अशोकराव, वायाळ राजेभाऊ खरावे, नारायण बागल, सुभाष राठोड, गणेशराव चव्हाळ, अरुण खराबे, गणेश शहाणे, नारायण दवणे, विठ्ठल गोंडगे, प्रसादराव गडदे, दौलत शहाणे, भगवान लहाने, एकनाथ खराबे, बाबाजी जाधव, सचिन राठोड, जानकीराम चव्हाण, असाबाई राठोड, कपिल तिवारी, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.AM News Developed by Kalavati Technologies