परभणीत उपासमारीमुळे एकाचा मृत्यू, रेल्वेस्थानक परिसरातील घटनेमुळे खळबळ

बेवारस नागरिकांना अन्न मिळणे मुश्किल

परभणी | परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये बेघर इसमाचा मृतदेह आढळून आला असून उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परभणीतही रस्ते निर्मनुष्य झाले पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात ठीकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परभणी शहरात बेवारस नागरिक शहरात फिरून मिळेल त्या अन्नावर आपला उदरनिर्वाह करीत असतात. मात्र गेल्या दोन दिवसापासून शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याने या बेवारस नागरिकांना अन्न मिळणे मुश्किल झाले आहे. यातच परभणी शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कुंजबिहारी हॉटेलच्या बाजुला 40 ते 50 च्या दरम्यान वय असलेला इसम गुरुवारी सकाळी मृतावस्थेत आढळला. आजूबाजूच्या परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता त्याला दारूचे व्यसन असल्याचे समजते सोबत उपासमार या दोन्हीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies