गजनीतील आमीर खान प्रमाणे; महाविकास आघाडी सरकारचे विस्मरण झाले - माजी मंत्री अनिल बोंडे

पिकांचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे

परभणी । संपुर्ण मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके हातची गेलेली असतांना, राज्यातील महाविकास आघाडी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांनीच बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार रूपये मदत देण्याची घोषणा केली होती. तिच मागणी आम्हीही करत आहोत. मात्र या सरकारला आपण शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनाचे विस्मरण झाले असेल. तर शेतकऱ्यांनी त्यांना चवनप्राश द्यावे का? असा सनसनाटी आरोप माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे.

परभणी येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा व शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी आ.विजयराव गव्हाणे, भाजपा महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांची उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री बोंडे म्हणाले की, राज्यात सर्वत्र ओला दुष्काळ पडलेला आहे शेतकऱ्यांचे खरीपाची पिके हाती गेल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना सरसगट मदतीची मागणी करीत असतांना शेतकऱ्यांच्या मुलाची लायकी या सरकारमधील मंत्री काढतात तसेच हे सरकार शेतकऱ्यांना कुटूंबातील घटकच समजत नसल्याचा आरोपही बोंडेंनी केला.AM News Developed by Kalavati Technologies