जालन्यात पुन्हा दोन नव्या रुग्णांची भर, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 54 वर

जिल्ह्याची रुग्ण संख्या ही 54 वर पोहोचली असल्यानं जिल्हावासियांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.

जालना | जालन्यात पुन्हा दोन नवे रुग्ण सापडले आहेत. आता जिल्ह्याची कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या ही 54 वर गेली आहे. शहरासह जालन्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा आता फैलाव होताना पाहायला मिळतोय. याआधी नवीन जालना भागातील एका खाजगी रुग्णालयात अनेक जणांना कोरोनाची बाधा झालीये. यात आणखी एका कर्मचाऱ्याचा अहवाल आज पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. तर जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथील एकाचा समावेश आहे. त्यामुळं जिल्ह्याची रुग्ण संख्या ही 54 वर पोहोचली असल्यानं जिल्हावासियांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.AM News Developed by Kalavati Technologies