भोकरदन शहरात मकर संक्रांत निमित्त दुकाने सजली

महिलांची विविध वस्तू घेण्यासाठी बाजारपेठ मध्ये मोठी गर्दी

जालना । भोकरदन शहरात मकर संक्रांत निमित्त बाजारपेठेमध्ये विविध वस्तू ची दुकाने सजली आहेत. मकर संक्रांत सण हा महिलांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या सणानिमित्त महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून वान तसेच वस्तू भेट देवून शुभेच्छा देतात. विविध वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, लेकिबाळी साठी कापड दुकानामध्ये साडी, कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.AM News Developed by Kalavati Technologies