हिंगोलीत एकाच दिवसात कोरोनाचे 56 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 654 वर

हिंगोलीत एकाच दिवशी राज्य राखीव पोलीस दलाच्या 33 जवानांसह 56 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

हिंगोली | जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या तपासणी अहवालात हिंगोलीत एकाच दिवशी राज्य राखीव पोलीस दलाच्या 33 जवानांसह 56 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच यामध्ये एकाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 654 वर पोहचली आहे असून आतापर्यंत 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 435 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 211 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, शेवाळा, चोंडी स्टेशन इतर ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies