हेमंत पाटील यांनी घेतली नितिन गडकरी यांची भेट, हिंगोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याच आश्वासन

प्रलंबित असलेली कामे लवकरच सुरू करण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिले

हिंगोली । आगामी काळात हिंगोली लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मतदारसंघातील प्रस्थापित असलेली रस्त्याची सर्व कामे तात्काळ सुरू करण्यात येतील व प्रलंबित असलेली कामे लवकरच सुरू करण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना दिले आहे. खासदार हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी जिल्ह्यातल्या रस्त्यांची कामे घेत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी भेट घेतली.AM News Developed by Kalavati Technologies