पतीशिवाय जगणे मुश्कील झाल्याने वैजापूरमध्ये उपोषण, 'मला पतीसोबत नांदू द्या' महिलेची मागणी

पती सत्यजित नोकरी निमित्ताने अमेरिकेत वास्तव्य करतो. विवाहानंतर 4 महिने प्राजक्ता अमेरिकेत पतीसोबत राहीली

औरंबाबाद ।  सासरच्या मंडळींच्या ञासाला कंटाळुन प्राजक्ता उदावंत यांनी 14 तारखेपासून उपोषणाला व धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. औरंगाबाद येथील विजयकुमार डहाळे याची मुलगी प्राजक्ता हिचा विवाह हिंदू धर्मातील रिती रिवाजाप्रमाणे सचिन उदावंत यांच्या मुलगा सत्यजित उदावंत यांच्या सोबत दि 6 मे 2018 रोजी झाला. सदर महीला वैजापूर येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकांची स्नुषा असुन त्यांचा कौटुंबिक वाद चव्हाटय़ावर आला आहे.

पती सत्यजित नोकरी निमित्ताने अमेरिकेत वास्तव्य करतो. विवाहानंतर 4 महिने प्राजक्ता अमेरिकेत पतीसोबत राहीली. नोव्हेंबर 2018 मध्ये तिला वैजापूर येथे सोडून सत्यजित अमेरिकेला गेला. तेव्हापासून त्याने पत्नीशी संपर्क केला नाही. याला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप प्राजक्ता हिने केला आहे. सासरा सचिन हरिभाऊ उदावंत, सासु सुशीला सचिन उदावंत, दीर सागर सचिन उदावंत व जाऊ हे याला जबाबदार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे व माझ्या पतीला परत आणून द्या या मागणीसाठी प्राजक्ता हिने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाने, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय सुवर्णकार संघटना सह, मिनाताई, सोनार, सुधाकर टाक, विजयराव डहाळे, भगवानराव शहाणे, मुकुंद नागरे, धनंजय पळशेरकर, भगवान उदावंत, अनिताताई शहाणे आदी उपोषणात बसलेले आहेत. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला.AM News Developed by Kalavati Technologies