'हा' व्हिडीओ व्हायरल करत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

परळी, तुला पोटाची चिंता नाही काय?

परळी । परळी, तुला पोटाची चिंता नाही काय? हा व्हिडीओ व्हायरल करून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना चिमटे काढले होते. आता पुन्हा एकदा एक नवीन व्हिडीओ व्हायरल करत पंकजा मुंडेंना कोंडीत धरण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला आहे. परळी ते अंबाजोगाई रस्त्याची प्रचंड दैना झाली आहे. पाच वर्षापासून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे भारताने चांद्रयान 2 मोहीम फत्ते केल्याचे दाखवीत परळीत मात्र चंद्रयान 3 ची मोहीम कशी आहे शिवाय लोक कशा कसरती करतात याचाच एक व्हिडिओ व्हायरल करून पंकजा मुंडेंच्या विकासा कामावर प्रशचिन्ह उपस्थित केल आहे.



AM News Developed by Kalavati Technologies